पाटणा ( वृत्तसंस्था ) – परसा बाजार पोलीस ठाण्याच्या कुरथौल गावात विचित्र प्रकरण समोर आले आहे. दोन मुलांची आई तिच्या चुलत सासऱ्यांसोबत पळून गेली आहे नैराश्यग्रस्त झालेल्या पतीने विष पिऊन आत्महत्या केली
दोन्ही मुलांना सोडून पळून गेलेल्या पत्नीमुळे नाराज झालेल्या पतीने परसा बाजार पोलिस ठाण्यात मदतीची याचना केली. या महिलेचे गावातच राहणाऱ्या तिच्या चुलत सासरच्यांसोबत अनैतिक संबंध होते.
पतीने याला विरोध केला असता त्याच्या या त्याच्या काकांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तीन दिवसांपूर्वी पत्नी दोन मुलांना सोडून ही महिला चुलत सासरच्यांसोबत पळून गेली.