मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील कोरोनास्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागल्याचे एक सकारात्मक चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. राज्याच्या आरोग्यविभागाने शनिवारी (२२ मे) दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत २६ हजार १३३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४० हजार २९४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर याच एका दिवसात ६८२ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने पुन्हा एकदा काहीसा दिलासा मिळत आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५१ लाख ११ हजार ९५ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.०४ टक्के इतका झाला आहे. तर, सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर १.५७ टक्के इतका आहे. दरम्यान, राज्यातील सद्यस्थिती जरी दिलासादायक असली तरी तिसऱ्या लाटेचा इशारा लक्षात घेता सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यकच आहे.







