मुंबई (वृत्तसंस्था) – संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला असल्याचा पलटवार लाड यांनी केलाय. तसंच बोलताना जरा भान ठेवून बोला, असा सल्लाही लाड यांनी राऊतांना दिलाय. मुंबई महापालिकेत 2 हजार 200 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतानाच मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम शिवसेना करत असल्याची टीकाही राऊत यांनी केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही लाड यांनी केला आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही राऊतांवर जोरदार टीका केलीय. ‘बोरु बहाद्दर म्हणतात विरोधक ब्लॅक फंगस आहेत. अच्छा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायम कडी लावून आणि दडी मारुन घरी बसलेले असतात काय? लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का? काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला’, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.







