मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना संकट काळात आता देशात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलंय. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1 हजाराच्या आसपास सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. एकीकडे या आजाराने रुग्णांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसवरुन जोरदार राजकारणही पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधक हे ब्लॅक फंसग असल्याची जहरी टीका केलीय. त्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

पुण्यात एका कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्धाटनावरेळी संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. कोरोना महामारीत मुंबईत चतांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलंय. मात्र, विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.







