• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना संकटात पुणे महापालिकेने संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळली – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत जी सर्वाधिक बाधित शहर होती. त्यामध्ये पुणे शहर आणि जिल्हा मिळून रुग्णसंख्या मोठी होती. या वाढत्या रुग्ण संख्येचा ताण साहजिकच शहरावर आल्याचे पाहण्यास मिळाले. एवढ्या कठिण परिस्थिती देखील पुणे महापालिकेने अतिशय संवेदनशीलपणे काम केले. शिवाय पुणे शहराने टेस्टींगमध्ये कुठे ही कमतरता येऊ दिली नाही.

पुणे, नागपुर या शहरात मोठ्या प्रमाणावर टेस्टींग झाल्याने, रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे’, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. तर आता आपल्याला तिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहावे लागणार असून त्या दृष्टीने तयारी करण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला.
पुणे महापालिकेच्या कोरोना लढ्याचे कौतुक करत देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ‘मी पुणे महानगरपालिकेचे विशेष अभिनंदन करतो की, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या उपकरणाचा फायदा महापालिकेच्या सर्व रूग्णालयांना होणार आहे. ही चांगली बाब असून आता आपण ज्या लाटेतून जात आहोत. त्यावेळी आपल्या देशभरात ऑक्सिजनची कमतरता जाणवली. त्याच दरम्यान ऑक्सिजन नाही, म्हणून अनेक घटना देखील झाल्या.

त्याहीपेक्षा प्रशासनाला सतत दबावाखाली राहावे लागत होते. कारण चार तासाचा स्टॉक, दहा तासाचा स्टॉक एवढी तारेवरची कसरत करून ऑक्सिजन यायचा. पण आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात जवळपास 800 प्लांट उभारले आहे. तर त्याच दरम्यान देशातील प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजनाचे वितरण योग्य प्रकारे केल्याने, प्रत्येक भागात ऑक्सिजन जाऊ शकला.

तसेच आता देशभरात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम केंद्र आणि तेथील राज्य सरकारच्या माध्यमांतून सुरू आहे. मात्र या सर्वामध्ये पुणे महापालिकेने आघाडी घेतल्याने सर्वांचे विशेष कौतुक आहे. आता येणार्‍या काळात अशाच प्रकाराचे आणखी प्लांट आपल्या शहरात उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आता आपल्याला तिसर्‍या लाटेची तयारी करावी लागेल, दुर्देवाने काही लोकांचे भाकीत आहे की, लहान मुलांना हा आजार होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेने पुढील तयारी करिता सज्ज राहून, त्या संदर्भात लागणारी साहित्य, तज्ञ डॉक्टर यांची टीम तयार ठेवा. जेणेकरून पुढील काळात अडचणी निर्माण होणार नाही.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहरात सुरुवातीच्या काळात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती. ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने अधिकाधिक तपासण्या करण्यावर अधिक भर दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. मात्र यामध्ये आम्हाला ऑक्सिजन तुटवडा अनेक वेळा जाणवला.

याच पार्श्वभूमीवर आम्ही ऑक्सीजन जनरेटिंग प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आणि आता उभारला देखील आहे. आता येत्या काळात पुढील तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात असून महापालिके मार्फत तयार करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका सज्ज असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.


 

 

Previous Post

लॉकडाऊन काळातील दुकानदारांच्या वेळेत बदल करा – आ. चिमणराव पाटील

Next Post

गोल्डन हार्ट ग्रुपतर्फे गरजू व्यक्तींना पादत्राणांचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोल्डन हार्ट ग्रुपतर्फे गरजू व्यक्तींना पादत्राणांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon