जळगाव ( प्रतिनिधी ) – भरधाव ट्रकच्या मोटारसायकलने जाणार्या बालकाला चिरडल्याने जागीच मृत्यू झाला हा अपघात आज मोहाडी गावाजवळ घडला .
सुजय गणेश सोनवणे (वय १३) आज दुपारी जळगावहून मोहाडीकडे जात होता.गावाजवळ उताराजवळ एमएच-२८ बी ७७०३ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या एमएच १९ डीएम ११ या क्रमांकाच्या मोटारसायकलला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे आप्तांनी गर्दी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प. सदस्य पवन सोनवणे, जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल आदींसह इतरांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.