• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेती खरेदीच्या बहाण्याने ८४ लाखाची फसवणूक ; तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुसऱ्याचा ३५ लाखाचा भूखंड तिसऱ्यानेच विकला ; पोलीस ठाण्यात फिर्याद

जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल येथे एलआयसी एजंटचा व्यवसाय करणाऱ्या ७१ वर्षीय व्यक्तीची शेतजमीन खरेदी विक्री व्यवहारातून तीन जणांनी ८४ लाख ५० हजाराची फसवणूक केली हा एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आर्थीक शाखेत वर्ग करण्यात आला आहे.

रघुनाथ शंकर निकुंभ (वय-७१ , रा. सरस्वती कॉलनी एरंडोल ) हे एलआयसी एजंट आहेत . त्यांची आनंद रामदास चौधरी उर्फ छोटू भगत ( रा. जहांगीर पुरा एरंडोल) आणि राजेंद्र अमृत धनगर ( रा. खेडगाव ता.एरंडोल ) या दोन इस्टेट ब्रोकरशी ओळख झाल्याने त्यांनी २०१९ मध्ये आनंदा चौधरी याचा मित्र राजू धनगर यांच्या मालकीची गट नंबर ९१/१ मधील जमिनीची खरेदी केली. नंतर रघुनाथ निकुंभ यांचा आनंदा चौधरी व राजेंद्र धनगर यांनी विश्वास संपादन केला त्यांनी दोघांच्या सांगण्यावरून एरंडोल तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी १२ जमीनींचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला काही जमिनीमध्ये आनंद चौधरी व त्यांची पत्नी संगीता चौधरी आणि त्याचा मुलगा प्रकाश चौधरी असे काही ठिकाणी सामायिक भागीदार आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये रघुनाथ निकम यांचे ७ लाख उधारीचे पैसे आनंदा चौधरी यांच्याकडून घेणे असल्यामुळे आनंदा चौधरी याने सामायिक शेतातील जमिन ही रघुनाथ निकुंभ यांच्या मुलाच्या नावावर करून देण्याच्या बहाण्याने खरेदी केला. परंतु ६ महिनेपर्यंत ७/१२ उताऱ्यावर मुलाचे नाव लागले नाही म्हणून त्यांनी चौकशी केली असता प्रांताधिकारी कार्यालयात आनंद चौधरी याने ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदणी न करण्याबाबत अर्ज दिला होता. याबाबत जाब विचारला असता आनंद चौधरी याने ही जमीन त्यांचीच असल्याचे सांगून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनी याआधी केलेले व्यवहार पडताळून पाहिले असता बऱ्याच व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

रघुनाथ निकुंभ यांना सप्टेंबर २०१९ मध्ये आनंदा चौधरी याने एरंडोल म्हसावद रस्त्यावर असलेला त्याचा मित्र राजेंद्र धनगर याचा भाऊ निंबा अमृत धनगर यांची रोडलगतची जमीन विक्री असल्याचे सांगून व्यवहार करण्यास सांगितले. त्यानुसार निकुंभ यांनी शेतजमीन निंबा धनगर यांच्याकडून आनंदा चौधरी यांच्या सामाईक भागीदारीने पत्नीच्या नावे खरेदी केले. या पोटी निकुंभ यांनी १७ लख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर एकाच महिन्यात आनंदा चौधरी याने पुन्हा निंबा धनगर हा उर्वरित ४० आर जमीन देखील विक्री करत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी आधीच्या जमिनीच्या बाजूलाच असल्यामुळे २० लाख रुपयांची असल्याबाबत कळविले. त्यानुसार निकम यांनी जमीन चांगली असल्याचे सांगून २० लाख रुपये रोख स्वरूपात (४० आर) जमीन खरेदी केली. व्यवहार करण्यापुर्वी आनंद चौधरी, राजेंद्र धनगर व उमेश पाटील यांनी कच्चे खरेदीखत दाखवले होते. मूळ खरेदीच्या दिवशी मुळखरेदीखत मध्ये मजकूर बदलून खरेदी करून घेतली. आनंद चौधरी यांनी पहिला खरेदीचा व्यवहार करताना ५० टक्के भागीदार होण्यासाठी त्याने देखील साडेसतरा लाख दिल्याचे निकम यांना भासविले, परंतु जमिनीचे मूळ मालक निंबा धनगर यांना जमीन ४ लाख ५० लाखात विक्री केल्याचे समजले आणि त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी ८० आर जमिनीतील सामायिक भागीदारी असलेली जमीन राजेंद्र चौधरी याने निकुंभ यांना न सांगता दिलीप देविदास चौधरी ( रा. तामसवाडी ) यांना २० लाखात परस्पर विक्री केली. या व्यवहारात निकुंभ यांची ३७ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली.

फेब्रुवारी २०२० मध्ये आनंदा चौधरी याचा मित्र राजेंद्र धनगर याच्या खेडगाव शिवारात गट नंबर १५० मधील महारू वंजारी यांची रोड लगतची (७३ आर) जमीन विक्री असल्याबाबत सांगितले. हा व्यवहार ४० लाख रूपयाचा असल्याचे सांगितले. या व्यवहारात आनंद चौधरी भागीदार होत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी निकम यांनी जमिनीपैकी ३६.५ आर जमीन २० लाख रुपये भरून खरेदी केली होती. व उर्वरित (३६.५ आर) जमिन आनंद चौधरी याने २० लाख रुपये भरून खरेदी केल्याचे भासवून जमिनीत भागीदारी केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये आनंद चौधरी यांच्याकडे निकम यांचे ७ लाख रुपये घेणे बाकी असल्याकारणामुळे परत करण्याबाबत विचारले असता त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगून गट नंबर १५०/१/२ मधील सामाईक जमीन मुलाचे नाव करून देतो असे सांगितले. परंतु मूळ मालक महारु वंजारी निकुंभ यांनी खात्री केली असता ही जमीन ३ लाख रुपयात आनंद चौधरी यांच्याकडे गहाण ठेवल्याची माहिती मिळाली. आनंद चौधरी याने निकम यांची या व्यवहारात देखील २७ लाख रुपयांची फसवणूक केली.

सन २०१९ मध्ये आनंद चौधरी याने निकुंभ यांना पुन्हा एरंडोल येथील धरणगाव रोडवरील विद्या नगर येथे रस्त्यालगत प्लॉट दाखवून ३० लाख रूपयांचा व्यवहार असल्याचे सांगितले. प्लॉट त्याने ३० लाख रुपयात त्याची पत्नी संगीता चौधरीचे नावे खरेदी केले सांगितले. परंतु प्लॉटची मूळ मालक यांना पैसे देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून भागीदारी होण्याबाबत विनंती केली म्हणून निकुंभ यांनी १५ लाख रुपये देऊन प्लॉटमध्ये भागीदारी होण्यास संमती दिली आणि खरेदी केली. परंतु व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खरेदीची चाचपणी केली. यामूळ मालक विलास गोकुळ पाटील यांना चौधरी त्याने शेजारचा प्लॉट खरेदी करून देण्याचा बहाण्याने त्यांच्या रहिवास असलेला प्लॉट स्वतःच्या पत्नीच्या नावे करून घेतला आणि १५ लाख रुपये घेऊन मला त्यात भागीदारी करून घेतल्याचे लक्षात आले. या व्यवहारात देखील निकम यांची १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

या तीनही व्यवहारात निकुंभ यांची ८४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. निकुंभ यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आनंदा चौधरी, राजेंद्र धनगर आणि मध्यस्थी वेंडर उमेश पाटील यांच्याविरोधात तीनही व्यवहारांमध्ये बनावट खरेदी खत तयार करून फसवणूक करून ८४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

पिस्तुलाच्या धाकाने बँक व्यवस्थापकाचे पैसे हिसकावले

Next Post

रावेर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पित्याकडे आरोपींची पंधरा लाखांची मागणी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पातोंडा येथे शासकीय महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन ; एका विरुद्ध तक्रार दाखल

रावेर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पित्याकडे आरोपींची पंधरा लाखांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon