जळगाव ( प्रतिनिधी ) – विषारी दारू विक्रीच्या गुन्ह्यातील रामेश्वर कॉलोनीतील आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .
विषारी दारू विक्रीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला आरोपीस पो उ नि दीपक जगदाळे , सुधीर साळवे ,सतीश गरजे, दत्तू बडगुजर, मंदा बैसाणे यांनी रामेश्वर कॉलनी येथून अटक केली होती. तिला आज रोजी न्या चषक यांच्या न्यायालयात हजर केले न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सरकारतर्फे अँड स्वाती निकम यांनी काम पहिले . या महिलेवर यापूर्वी अवैध दारू विक्रीचे तीन गुन्हे दाखल आहेत.