मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील एका तरुणाची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी राहत्या घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन रघुनाथ धायडे (वय-३०) रा. घोडसगाव ता. मुक्ताईनगर हे खाजगी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एवाय १०९९) क्रमांकाची दुचाकी आहे. १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता धायडे यांनी दुचाकी घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार १९ मार्च रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. परिसरात शोध करून दुचाकी मिळून न आल्याने मुक्ताईनगर पोलिसात धाव घेतली. गजानन धायडे यांच्या फिर्यादीवरून मुक्तानगर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ संजीव पाटील करीत आहेत.







