अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर गेल्या १४/१५ वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा यंदाचा “मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार २०२० ” दिपक उखर्डू वाल्हे सर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र परिट धोबी युवा संघटना यांना सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि २२ जानेवारी २० शुक्रवारी रोजी शिर्डी येथे शिर्डी चे खासदार मा.सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय किर्तनकारसमाज प्रबोधनकार निवुत्ती महाराज महाराज इंदुरीकर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सरपंच संघाचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे सरपंच संघाचे संस्थापक चिटणीस बाबासाहेब पावसे हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थित दिपक उखर्डू वाल्हे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.







