जळगाव ( प्रतिनिधी ) – औरंगाबाद महामार्गावरील पाळधी ता.जामनेर येथील नाचणखेडा चौफुली येथे नवीन महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच ठिकाणावरुन शाळेचे विद्यार्थी आणि अनेक ग्रामस्थांचा वावर आहे आणि वेगात येणाऱ्या वाहनांमुळे महामार्ग पार करतांना मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खुद्द शिक्षक महामार्गवर उभे राहुन विद्यार्थ्यांना सहकार्य करतात.
हा धोका लक्षात घेता आणि रोजच होत असणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी वेगाने येणाऱ्या वाहनांची गती कमी व्हावी यासाठी पाळधी येथील नाचणखेडा चौफुली आणि जुणे बस स्थानक परिसरात गतिरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा १५-२० दिवसांनंतर संपूर्ण गाव व परिसरात मिळुन आंदोलन पुकारण्यात येईल यासंबंधीचे निवेदन शिवसेना-युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने अपर जिल्हा अधिकारी प्रविण महाजन यांना देण्यात आले.
प्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील,शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक ईश्वर चोरडिया,युवा तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव,ग्रा.पं.सदस्य आसिफ पठाण, संदिप पाटील हे उपस्थित होते.