भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील डायमंड कॉलनी परीसरातील आवेश पार्कमध्ये राहणार्या संशयीताकडे गुटख्याचा साठा असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी 22 रोजी रात्री 10 वाजता छापा मारत 54 हजारांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी यासीन उर्फ अज्जू अन्वर शेख (21, भुसावळ) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, श्रीकृष्ण देशमुख, सचिन चौधरी, संकेत झांबरे आदींच्या पथकाने केली. आरोपीच्या घरातून प्रतिबंधीत विमल मसाला गुटख्याचे 88 पाकिट, केशरयुक्त विमल मसाल्याचे 156 पाकिट, सुगंधी तंबाखूचे 156 पाकिट, व्ही-1 सुगंधी तंबाखूचे 88 पाकिट मिळून एकूण 53 हजार 680 रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध संकेत झांबरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.







