जळगाव ( प्रतिनिधी ) – मागील भांडणाच्या कारणावरून तरूणाला दोन जणांनी गडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना सुप्रिम कॉलनीतील फिरदोस डेअरी जवळ घडली. २२ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला
अमन सय्यद रशिद (वय-२१) हे पोलीस कॉलनी येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तो मजूरी करून उदरनिर्वाह करतो. २१ ऑगस्ट रोजी रात्री सुप्रिम कॉलनीतील फिरदोस डेअरीजवळ उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून मुक्या शहा आणि समिर शहा ( दोन्ही रा. पोलीस कॉलनी ) यांनी शिवीगाळ करून दगडाने बेदम मारहाण करून जखमी केले २२ ऑगस्ट रोजी रात्री संशयित मुक्या शहा आणि समिर शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना सचिन पाटील करीत आहेत.