जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरण कंपनीत नोकरीला असलेल्या तरूणाची २० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय हिरालाल (वय-२७) हे अहुजा नगर येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. महावितरण कंपनीत नोकरी करतात. नोकरीवर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १० सीके ९०९२) क्रमांकाची मोटारसायकल आहे. २० ऑगस्ट रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी घरासमोर मोटारसायकल लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेल्याचे २१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीला आले अक्षय पाटील याने सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही मिळून आली नाही. २२ ऑगस्ट रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करणत आला पुढील तपास पो ना प्रकाश चिंचोरे करीत आहेत.