जळगाव (प्रतिनिधी) – येथील बजरंग बोगद्याजवळील रेल्वे रुळाजवळ एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे दिसून आले. मात्र, तरुणाचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.
पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या २४ वर्षीय अविनाश शैलेंद्र सोनवणे हा युवक चायनीज खाद्यपदार्थाचा व्यवसाय करतो. गुरुवारी २२ रोजी दुपारी तो घराबाहेर पडला होता. दरम्यान बजरंग बोगदा जवळील रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळला बाजूलाच त्याची दुचाकी दिसून आली. रेल्वे पोलिसांनी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविला होता. त्याची ओळख दुपारी ४ वाजता पटली. अविनाश सोनवणे याचा मागील महिन्यात साखरपुडा झाला होता. त्याचा घातपात झाला असावा अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. अविनाशच्या पश्चात तीन भाऊ, आई असा परिवार आहे. सदर या प्रकरणी जळगाव पोलीस तपास करीत आहे. आत्महत्याचे अद्याप समजलेले नाही.