जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर जाण्यासाठी निघालेल्या रिक्षा चालकाला कारमधील अज्ञात चार जणांनी बेदम मारहाण केली. खिश्यातील पैसे काढून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात चार व्यक्तींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दिपक रतिलाल माळी (वय-२८) रा. पाधळी, ता. धरणगाव हे एक रिक्षा चालक आहे. जळगाव शहर ते पाळधी दरम्यान रिक्षा चालवतात. काल बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास (एमएच १८ डब्ल्यू ४५८८) क्रमांकाच्या रिक्षाने खासगी कामाच्या निमित्ताने जामनेर जाण्यासाठी शहरातील अजिंठा चौफुलीवर आहे. रिक्षा लावल्यानंतर जामनेर जाण्यासाठी रोडवर उभे होते. त्यावेळी एक कार येवून चालकाने जामनेर जाण्यासाठी विचारले, दिपक हे जामनेर जाण्यासाठी कारमध्ये बसले, पुढे रेमंड चौकात कार थाबवून कारच्या बाजूला बसलेले अज्ञात व्यक्तींनी दोन्ही हात पकडून खिश्यातील १२५० रूपये बळजबरीने हिसकावून जीठे ठार मारण्याची धमकी दिली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर अज्ञातांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. अंगाची झाडाझडती घेतल्यानंतर कारच्या खाली उतरवून दिले. एमआयडीसी पोलीसात धाव घेवून कार चालकासह इतर तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंद सिंग पाटील करीत आहेत.