भुसावळ (प्रतिनिधी) – चाकूच्या धाकावर एकाला धमकावत त्याच्याकडील चार हजार ९०० रुपयांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री जामनेर रोडवरील दीनदयाल नगराजवळील फकीर गल्ली, मस्जिदच्या मागे घडली. या प्रकरणी अनिल हनुमानसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाकूर यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रीक्षा सीट कव्हरची मजुरी देण्यासाठी फकीर गल्ली, गिरीश किराणा समोर मोटरसायकल लावून जात असतांना संशयीत आरोपी अशोक कोळी उर्फ भाचा (पूर्ण नाव माहीत नाही), जावेद उर्फ पोटली (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य एका अनोळखीने ठाकूर यांना अडवले. एकाने तक्रारदाराचे तोंड दाबले तर दुर्सयाने गळ्यावर चाकू लावत पॅॅण्टच्या खिशातील चार हजार ९०० रुपयांची रोकड हिसकावत तक्रारदाराला खाली पाडत पळ काढला. रविवारी मध्यरात्री तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.








