जळगाव (प्रतिनिधी) – स्वतःच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी मित्राकडून चॉपर घेणाऱ्या तरुणांसह मित्रालाही एलसीबीच्या पथकाने शहरातून अटक केली आहे.

गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानुसार शहरातील वैष्णवी पार्ककडे जाणाऱ्या रोडवरील मातोश्री शाळेजवळ एका तरूणाच्या हातात चॉपर असल्याची खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मातोश्री शाळेजवळून संशयित आरोपी पवन नारायण कापसे (वय-२५) रा. वैष्णवी पार्क, याला अटक केली. त्याने हा चॉपर मित्र परेश आनंदा गोयर (वय-२६) रा. वैष्णवी पार्क याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस कर्मचारी करीत आहे. दरम्यान परेश गोयर हा शहरातील सुप्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर असल्याचे बोलले जात आहे.







