जळगाव (प्रतिनिधी) – धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जळगाव-आसोदा रेल्वे अपलाईन रेल्वेलाईनजवळ अंदाजे ५५ वर्षीय अनोळखी प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २२ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव ते आसोदा रेल्वे च्या डाऊन लाईनवर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका ५५ वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृत्यू झाल्याची घटना समवारी १० मे रोजी सकाळी उघडकीला आली. रेल्वे कर्मचारी तथा ट्रॅकमॅन उमेश भारंबे यांनी यासंदर्भात जळगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक यांना घटनेची माहिती कळविली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीसांना अपघातविषयी माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार अनिस सपकाळे आणि पोहेकॉ मराठे यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव तालुका पोलीसांकडून करण्यात येत आहे.