जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील शेंदुर्णी येथे भाजपा नगरसेवक शरद बारी याने शेंदुर्णी येथे एका महिलेच्या घरात घुसुन धमकावत तिच्यावर अतिप्रसंग केल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेने आरडा ओरड करताच नागरीकांनी महिलेची सुटका करत नगरसेवकाची बेदम धुलाई केली असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहे.
शहरात महिलेच्या घरात पती घरी नसल्याचे पाहून जबरदस्तीने घुसुन धमकावत तीच्यावर अतीप्रसंग केला. महिलेने विरोध केला असता तीला धमकाविण्यात आले. सदर प्रकाराबाबत आसपासच्या नागरीकांना याची कुणकुणलागताच. नागरीकांनी घरात घुसुन महिलेची सुटका करत सदर नगरसेवकाची बेदम धुलाई केली. पोलीसांना पाचारण करून स्वाधीन करण्यात आले.
सदर घटनेच्या गुन्ह्याची नोंद पहुर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलि आहे. पुढील तपास सुरु असून सदर नगरसेवकावर पाचोरा येथे उपचार सुरु आहे.
सदर घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. तसेच , एक दिड महिन्यांपूर्वी भाजपाच्या उपनगराध्यक्षाला विनयभंग प्रकरणी जामनेर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.