लग्नसमारंभ मध्ये 50 पेक्षा जास्त गर्दी असल्याने

वधु – वर पक्षाकडून 20 हजार रु.दंड वसूल
जामनेर (प्रतिनिधी) – पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचे सत्र सुरु केले आहे. लग्न सोहळ्याला 50 पेक्षा जास्त लोकांना निर्बंध लावण्यात आले असताना देखील गर्दी होत आहे. कुणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही आहे असेच दि. (२१) रोजी मोठी लग्नतिथ असताना मंडपात गर्दीच मावत नव्हती.
विवाह सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असल्या कारणाने जामनेर नगर पालिकेच्या वतीने आज पाचोरा रोड जवळील बाबाजी राघो मंगल कार्यालया मध्ये १५ हजार रुपये आणि जळगांव रोड जवळील सभागृहातून ५ हजार रु. असा दोघही विवाह सोहळ्यातील वधू-वर पित्याकडून विस हजार रुपये दंड वसुल हा गर्दीप्रमाणे करण्यात आल्याची माहिती नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली.
तब्बल २० हजाराचा दंड वसुल करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होवु नये; यासाठी शासनाकडुन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लग्नसराईत गर्दी वाढु नये,यासाठी नगर पालिका व पोलिस प्रशासन यांची करडीनजर असुन विवाह सोहळ्यात नियमांचे पालन, सोशल डिस्टान्सिंग किंवा मास्क न लावलेली व्यक्ती आढळल्यास दंड वसूल केला जात आहे.







