जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ एका अनोळखी ३५ वर्षीय पुरुषाचा रेल्वेच्या धक्क्या लागल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ उघडकीला आली आहे. यासंदर्भात जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे खंबा क्रमांक ३९८/ ११-१३ दरम्यानच्या डाउन मुख्य रेल्वे लाईनमध्ये एक ३५ वर्षे अनोळखी पुरुषाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास समोर आले. यासंदर्भात म्हसावद स्टेशन मास्तर यांनी जळगाव रेल्वे पोलीस चौकीला फोन द्वारे माहिती कळविली. त्यानुसार जळगाव रेल्वे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन अनोळखी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. तर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप मयताची ओळख पटलेली नसून रेल्वे पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात जळगाव रेल्वे पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर करीत आहे.