जळगाव ( प्रतिनिधी ) – तक्रारदाराच्या बहिणीचे नाव सात बारा उताऱ्यावरून कमी करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने लाच स्वीकारणाऱ्या यावल तालुक्यातील मालोदच्या (ता.यावल ) कोतवालाला आज सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले
तक्रारदार.नायगाव (ता.यावल ) येथील रहिवाशी आहे . जहाँगीर बहादुर तडवी ( कोतवाल तलाठी कार्यालय मालोद, ता.यावल ) व मनोहर दयाराम महाजन, ( रा.किनगाव ता.यावल ) अशी आरोपींची नावे आहेत .
तक्रारदार यांची सावखेडासिम येथे शेत गट क्रं.२८१ मधील १ हेक्टर २१ आर शेतजमीन असून ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकार नोंद मधील तक्रारदार यांची बहिण कमलबाई यांचे नाव मंडळ अधिकारी ( किनगाव ) यांचेकडून कमी करवुन देणार असल्याचे सांगुन आरोपीनी मंडळ अधिकारी किनगाव यांचे नावाने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 5,000/-रुपये लाचेची मागणी केली व आरोपी कोतवालाच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम मनोहर महाजन याने मंडळ अधिकारी किनगाव कार्यालयासमोर विद्या जनरल स्टोअर्स येथे स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पो नि .संजोग बच्छाव, पो नि एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.