जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली प्र न येथील प्राजक्ता बुंधे ( बारी ) यांच्या संशयास्पद मृत्यूच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने आज ५ पैकी ३ आरोपींना जामीन मंजूर केला आहे
या ५ आरोपींपैकी प्राजक्ता बारीचा जेठ विजय बुंधे , सासू शोभाबाई बुंधे व नणंद वैशाली अशोक काळे यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे . तिचा पती आणि सासर्याचा मुक्काम अजून तुरुंगातच आहे
प्राजक्ताच्या आई मालती नंदलाल बारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पतीसह सासरच्या ५ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्राजक्ताचा मृत्यू अजय बुंधे (पती) , अशोक बुंधे (सासरा) , शोभाबाई बुंधे (सासु) , विजय बुंधे (जेठ) , वैशाली अशोक काळे (ननंद , सर्व रा. शिरसोली प्र न ) यांनी घडवून आणल्याचा आरोप आहे . या आरोपींच्या विरोधात भादवि कलम 304 (ब) ,498 (अ) या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.