साक्षीदार कर्मचाऱ्यांना धमकावणारे आरोपी पोलिसांना सापडेनात !
जळगाव ( प्रतिनिधी ) – चिन्या जगताप हत्याकांडातील फरार आरोपी व कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी असलेली ही टोळी कशी भयंकर कारस्थानी आहेत हे आता स्पष्ट झाले आहे . पोलिसांना ते सापडत नसले तरी त्यांचे हस्तक फिर्यादी महिलेसह साक्षीदार असलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत . मुख्य आरोपी अधिक्षक पेट्रस गायकवाड फरार असला तरी त्याचा धुळे कारागृहातून रजेचा अर्ज मंजूर होतो आणि त्याला पगारपण दिला जातो अशी नवीच जमाडीगंमत आता समोर आली आहे .
अनिल सुरेश बुरकुल ( कारागृह शिपाई धुळे जिल्हा कारागृह , सध्या नेमणुक किशोर सुधारालय, नाशिक ) यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , जळगांव जिल्हा कारागृहात मयत न्यायाधीन बंदी चिन्या ऊर्फ रविंद्र जगताप याचा अधिक्षक पेट्रस गायकवाड यांनी केलेल्या अमाणुष मारहाणीत झालेल्या मृत्यु प्रकरणात मी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ, औरंगाबाद येथे क्र. 1706/2020 नुसार याचिका दाखल केलेली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 548/2021 भाद वि. कलम 302, 143, 147,201 दिनांक 30.11.2021 रोजी दाखल झालेला असुन, आरोपी फरार आहेत.
मुख्य आरोपी पेट्रस गायाकवाड गुंड प्रवृत्तीच्या मध्यस्थांमार्फत माझ्यासह फिर्यादी महिला व सरकारी साक्षीदार रक्षक मनोज जाधव याचेवर केस मागे घेणेसाठी ब जबाब बदलणेकरीता दबाव आणुन धमक्या देत आहे. याबाबत आपणाकडे वेळोवेळी फिर्यादी, साक्षीदार व याचिकाकर्ता यांनी रितसर तक्रारी अर्ज सादर केलेले आहे.
मुख्य फरार आरोपी तत्कालीन जेल अधिक्षक पेट्रस गायाकवाड याचा सहकारी एन. यु. पाटील (प्रशासन अधिकारी) धुळे जिल्हा कारागृह हा सतत पेट्रस गायकवाड याचे संपर्कात असुन, मी गुन्हा दाखल होणेकरीता उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे प्रतिशोधाच्या भावनेने मित्र प्रेमापोटी एन. यु. पाटील (प्रशासन अधिकारी) धुळे जिल्हा कारागृह हा मला सातत्याने मानसिक त्रास देत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पदाचा दुरुपयोग करुन एन. यु. पाटील (प्रशासन अधिकारी धुळे जिल्हा कारागृह ) हा वेगवेगळया मार्गाने मला कर्तव्याच्या ठिकाणी वेठीस धरुन रजा, वेतन, घरभाडे, भ.नि.निधीची बिले जाणीव पुर्वक आडबिणे असे प्रकार वारंवार करीत आहे
दिनांक 16.02.2022 रोजी एन. यु. पाटील नाशिक येथे मी कर्तव्यावर असतांना मला सायंकाळी 05.00 ते 05.30 दरम्यान भेटलेला असुन, त्याने मला केस मागे घे, साक्षीदार मनोज जाधव हा तुझा मित्र असुन, त्याला जबाब बदलण्यास सांग “तुला सोडणार नाही. तुझ्या कुटुंबाची तुला काळजी नाही का”,”जर तु पंधरा दिवसात निर्णय घेतला नाहीस तर तुझे काय होईल ते तु बर्घ” . अशा प्रकारे मला गर्भीत माझे जिवास व कुटुंबास धोका निर्माण करणारी धमकी दिलेली आहे. एन. यु. पाटील याने मुख्य फरार आरोपी पेंट्रस गायकवाड याचे संदर्भात दिनांक 25.01.2020 ते 30.11.2021 पर्यंत धुळे कारागृह येथे दिलेले सर्व
तक्रार अर्ज व या गुन्हयाशी संबधित महत्वाचे दस्ताऐबज गहाळ केलेले आहे. आरोपी पेट्रस गायकवाड यास शासकोय कर्मचारी असतांना बेकायदेशिर मदत करणे, फरार आरोपी असतांना त्याचा रजा अर्ज घेवून सहकार्य करणे, बेकायदेशिर रित्या कार्यालयात गैर हजर न दाखविता फरारी कालावधीचे वेतन काढणे, फरार आरोपीशी संगनमत करुन साक्षीदार, फिर्यादी ब याचिकाकर्ता यांचेबर दबाब आणने, फरार आरोपीशी पोलीस यंत्रणेच्या डोळयात धुळफेक करुन संपर्कात राहणे सुरु ठेवले आहे या गुन्हयात भा.द.वि. कलम 201, 143, 147, इत्यादी मध्ये हा आरोपो ठरु शकतो. त्याला सह आरोपी बनवण्याची मागणी अनिल बुरकूल यांनी पोलिसांकडे केली आहे .