• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जय जय परशुराम जयघोष… लेझीम, ढोल पथकांचा निनाद अन् समाजबांधवांचा ओसंडून उत्साह…

भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरात शोभायात्रा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – समाजबांधवांच्या उत्साहामध्ये आणि “जय जय परशुरामा”च्या जयघोषामध्ये शहरात शनिवारी २२ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषामध्ये भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा विविध मार्गांवरून काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये महिला व लहान मुलांचे लेझीम आणि ढोल पथकाने विशेष लक्ष वेधून घेतले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुभाषिक ब्राह्मण संघ “श्री परशुराम जन्मोत्सव २०२३” साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी १० वाजता भगवान श्री परशुराम पूजन जुने श्रीराम मंदिर, रथ चौक येथे झाले. यावेळी स्वाती – संजय कुलकर्णी व सौ. संतोष – शिवप्रसाद शर्मा या दोन दाम्पत्यांनी पूजन केले. प्रसंगी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संध्याकाळी ४ वाजता जूने जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थान येथे भगवान श्री परशुराम यांच्या रथयात्रेचे संस्थांनचे गादिपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. रथयात्रा वाजत गाजत भवानी माता मंदिर या ठिकाणी आली. येथे पंडित महेश त्रिपाठी, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव, एड. सुशील अत्रे अशोक साखरे, अशोक वाघ, प्रशांत जुवेकर, पियुष रावळ यांच्या हस्ते भगवान श्री परशुराम यांचे पूजन करण्यात आले.प्रसंगी सकल् समाजाचे सर्व अध्यक्ष तथा प्रमुख देणगीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर भगवान श्री परशुराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये अग्रभागी भगवान श्री परशुराम यांची भव्य मूर्ती ठेवण्यात आलेली होती. मूर्तीच्या मागे फिरणारे चक्र लक्ष वेधून घेत होते. दाणा बाजारामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रथ पूजन करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आमदार राजूमामा भोळे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गुलाबराव देवकर, वाल्मीक पाटील, श्रीराम खटोड, दीपक जोशी, श्रीकांत खटोड, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर महिला मंडळाचे अध्यक्ष मनीषा दायमा मंचावर उपस्थित होते. आमदार भोळे आणि गुलाबराव् देवकर यांनी मनोगत मधून समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

मिरवणुकीमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेशभूषांमध्ये अथर्व कुलकर्णी तर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषामध्ये लक्ष्मी जोशी, अश्वध्वज घेऊन घोड्यावरती स्वार झालेले होते. मिरवणुकीमध्ये समाज बांधवांनी फेटे आणि भगव्या टोप्या तर हातामध्ये भगवेध्वज घेऊन सहभाग नोंदवला होता. लहान मुलांसह महिला व पुरुषांनी मिरवणुकीमध्ये जल्लोष केला. मिरवणुकीचे विविध संस्थांतर्फे स्वागत करण्यात येत होते.

शोभायात्राचा नेताजी सुभाष चौक, दाणा बाजार, चित्रा चौक मार्गे शिवतीर्थ मैदान या ठिकाणी समारोप झाला. येथे भगवान श्री परशुराम यांची महाआरती झाली. प्रसंगी दादा महाराज जोशी यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. शोभायात्रा व विविध कार्यक्रमांसाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 

Tags: #bhagwan parshuram shobhayatra news jalgaonhttps://kesariraj.com/22-april-23-n-7/
Previous Post

शिंदे गट भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट – खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Next Post

मध्यस्थी करणे भोवले ; ग्रामपंचायत सदस्यावर चॉपरने वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मध्यस्थी करणे भोवले ; ग्रामपंचायत सदस्यावर चॉपरने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon