जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जगवानी नगरात राहणाऱ्या वृद्धाच्या उघड्या घरातून मध्यरात्री ८० हजार रुपयांची रोकड चोरल्याची घटना घडली आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती वरून, निवृत्ती नथू पाटील (वय – ८०, रा. जगवानीनगर, एमआयडीसी, जळगाव) हे आपल्या परिवारासह राहायला आहे. ४ एप्रिल सायंकाळी ५ वाजता ते ८ एप्रिल दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील लाकडी कपाटातून ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हे रोकड पल्लवी उर्फ सोनी प्रवीण हिवाळे रा. हिवरा, ता. मलकापूर जि. बुलढाणा हिने चोरून नेल्याच्या संशय निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता निवृत्ती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.