भुसावळ (प्रतिनिधी) – अमरावती शहरात बलात्काराचा गुन्हा करून फरार झालेल्या भुसावळ शहरातील एका संशयित आरोपीला २ वर्षांनी अटक करण्यात आली. भुसावळच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली .

अमरावती शहरामधील नागपुरी गेट पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुरेश डबरे यांनी दि. 21.ऑक्टोबररोजी अमरावती शहरमधील नागपुरी गेट पोलिस ठाण्यात 2018 साली गुन्हा दाखल असुन यातील फरार संशयित आरोपी नामे विशाल जितेंद्र जावळे (वय – 23 रा.जामनेर रोड, वाल्मीक नगर भुसावळ) हा असुन त्याचा शोध घेण्याबाबत कळवले होते .
त्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त माहीती मिळाल्याने 21 ऑक्टोबररोजी भुसावळ शहरातुन टिंबर मार्केट परिसरातुन संशयित आरोपीस ताब्यात घेवुन अमरावतीमधील नागपुरी गेट पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार .सुरेश डबरे व पो.ना. अकिल खान यांना पुढील कारवाईसाठी त्यांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलिस.अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पो.अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याचे स.पो.नि अनिल मोरे, स.पो.नि मंगेश गोटला, पो.ना रविंद्र बि-हाडे, कृष्णा देशमुख, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, पो.कॉ विकास सातदिवे, प्रशांत चव्हाण, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, सचिन चौधरी, योगेश माळी, सुभाष साबळे यांनी केली.







