जळगाव (प्रतिनिधी) – माझ्या मतदार संघात मुक्ताईनगरमध्ये एकनाथराव खडसेंनी हस्तक्षेप केला तर, मी तो सहन करणार नाही. शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे यांचा मी लाडका आमदार आहे. हस्तक्षेप करणे हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यांनी हस्तक्षेप केला तर मी माझ्या स्टाईलने उत्तर देईल. असे मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, माझ्यासाठी मुक्ताईनगर मतदार संघाचा विकास महत्वाचा आहे. निष्ठा काय असते ते माझ्याकडे पाहावे. खडसे निष्ठावंत नाही असेही ते म्हणाले.








