पंजाब (वृत्तसंस्था) – भारतीय वायुसेना दलाचे मिग २१ हे लढाऊ विमान काल रात्री उशिरा कोसळले. पंजाबच्या मोगा शहरालगत हा अपघात झाला. याबाबत भारतीय हवाई दलाकडून ही माहीती देण्यात आली आहे.
नियमित प्रशिक्षणासाठी या विमानाने उड्डाण घेतले होते, त्याचवेळी विमानाला अपघात झाल्याची माहिती, वायू दलाकडून देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरुन या विमानाने उड्डाण घेतलं होतं.भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मोगाच्या कस्बा बाघापुराना गावाच्या लंगियाना खुर्दजवळ रात्री १.०० वाजल्यादरम्यान हे विमान कोसळलं. अपघातानंतर विमानानं पेट घेतला.
पश्चिम क्षेत्रात कोसळल्यानंतर या विमानाचा पालयट स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी गंभीररित्या जखमी झाले होते. शुक्रवारी सकाळी पायलट अभिनव यांचा मृतदेह हाती घेण्यात आला आहे. हवाईदलाकडून या दु:खद घटनेवर शोक व्यक्त करण्यात आला आहे.
मिग २१ विमानाचा हा अपघात नेमका कसा घडला? त्याची माहिती मिळवण्यासाठी या घटनेच्या ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहेत.