जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात हद्दपार गुन्हेगारासह एकास धारदार शस्त्रांसह एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोकॉ. ईश्वर संजय भालेराव यांनी फिर्याद दिली आहे. जुनेद शेख उर्फ बवाली युनूस शेख (वय २६,रा. बिलाल चौक, तांबापुरा) हा जळगाव जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार आहे. तो सिंधी कॉलनी रस्त्यावरील कंवरनगर पोलीस चौकी परिसरात २० मे रोजी ८ वाजेच्या सुमारास दुसरा संशयित आरोपी रहीम शेख सलीम (वय २८, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यांचेसह पोलिसांना मिळून आला. रहीम शेख यांचेकडे कमरेला लोखंडी लहान तलवार मिळून आली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव यांचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना सचिन मुंढे करीत आहेत.