रावेर (प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेस तिच्या वडिलांसह कपडे फाडून जबर मारहाण करीत विनयभंग केला. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर विवाहित महिला हि तिच्या वडिलांच्या घरी आली होती. त्यावेळी संशयित आरोपी आकाश जीवन मोहोसे याने सिमकार्ड मागितले. ते दिले नाही म्हणून संशयित आरोपी आकाश जीवन मोहोसे व त्याचा भाऊ रोहन जीवन मोहोसे यांनी महिलेच्या अंगावरील कपडे फाडून छातीवर, अंगावर, खांद्यावर नखांनी ओरबाडत विनयभंग केला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे वडिलांच्या डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने कपाळावर अंगावर काठीने व हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. तसेच, फिर्यादी महिलेचा मोबाईल फोडून नुकसान केले. अश्लील शिवीगाळ करून मी जेलमधून बाहेर आल्यावर बंदुकीने उडवीन अशी धमकी दिली.
याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशन येथे महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अन्वर तडवी करीत आहे.