पाचोरा (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना अनुदानासह धान्य पुरवठा तात्काळ मिळण्यासाठी आज पाचोरा येथे कॉंग्रेस पक्षाने काढलेल्या शिंगाडा मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधले होते.
पाचोरा तहसील कार्यालयावर शहर आणि तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी आज पाचोरा कॉंग्रेसने आयोजित केलेल्या शिंगाडा मोर्चाला सकाळी आठवडे बाजारातुन सुरुवात झाली. मोर्चाचे नेतृत्व पाचोरा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले . या मोर्चात प्रमुख मागण्यात पाचोरा शहरातील स्वस्त धान्य दुकानातून जानेवारी २०२२ चा मोफत धान्य अद्याप पुरवठा झाला नाही. तालुक्यातील काही ठिकाणी पुरवठा बाकी आहे तो तात्काळ देण्यात यावा. शहरातील जवळपास २२०० दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत मात्र केवळ चार कुटुंबांना लाभ दिला जातो २० वर्षापासुन बीपीएल धारकांनावर अन्याय होत असुन त्यामुळे धान्य मिळत नाही. त्या कुटुंबाना तात्काळ समाविष्ट करण्यात यावे . ज्यांच्यामुळे लाभार्थी वंचित राहिले त्यांची चौकशी सुरू करुन कारवाई करण्यात यावी. शहर व तालुक्यात काही मयत लाभार्थीच्या नावे धान्य पुरवठा केला संबंधित लाभार्थींनी दुकानदारांना वेळोवेळी सुचित करुनही बदल केला केला नाही अशा बेजबाबदार दुकानदारासह संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. विधवा, परीत्यक्ता, दिव्यांग, अनाथ यांना बीपीएलमध्ये समाविष्ट करण्यात यावे. शासकीय तुकडाबंदी कायदा असताना त्याची अंमलबजावणी न करता बेकायदेशीर खरेदी होत असुन तलाठी त्याची नोंद गैरकायदा करत आहे याची चौकशी करून कारवाई करावी यासह अनेक मागण्यांचे आधीच दिले होते.
या निवेदनातील सर्वच मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन तहसीलदार कैलास चावडे यांनी देवुन शेतकऱ्यांना अनुदानाचा दुसरा टप्पा तातडीने देण्यात येणार असल्याचे सांगितले.अपगांना बीपीएलमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, आरोग्य सेवा सेल जिल्हा सरचिटणीस डॉ अनिरुद्ध साळवे, संगिता नेवे, कुसुम पाटील , अॅड मनिषा पवार , ओबीसी तालुकाध्यक्ष इरफान मनियार, अॅड वसिम बागवान, शंकर सोनवणे, शरीफ शेख, गणेश पाटील , युसूफ टकारी, सोशल मीडिया विधानसभा क्षेत्राध्यक्ष राहुल शिंदे ., तालुकाध्यक्ष कल्पेश येवले, इस्माईल तांबोळी, राजेंद्र महाजन, अल्ताफ खान, रहीम शेख, सचिन सोनवणे, रवी सुरवाडे, अमजद मौलाना, प्रदीप चौधरी, सलीम शेख, नसोरीद्दीन तडवी , सुनील पाटील, शिवराम पाटील, लक्ष्मण पाटील यावेळी उपस्थित होते.