जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेले आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील १५ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ मार्चरोजी दुपारी अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. संशयित आरोपी भुषण तुकाराम कोळी ( रा. डांभुर्णी ता. यावल ) याने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील यांनी दिली आहे. त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कोठेही आढळून आली नाही. २० मार्चरोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भुषण कोळी याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि राजेंद्र साळुंखे करीत आहेत.