चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चोरीच्या गुन्ह्यात अटकेतील दोन जणांकडून अन्य तीन गुन्ह्यातील ८८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना यश आले आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात १६ जानेवारीरोजी दाखल गुन्ह्यात अटकेत असलेले संशयित आरोपी योगेश राजेंद्र कुमावत (वय-२५) आणि छायाबाई उर्फ वर्षा नारायण पाटील ( दोन्ही रा. मुंदखेडे ) यांना अटक करण्यात आली होती. यापुर्वी त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. दरम्यान दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यातील १२ हजार रूपयांची रोकड आणि ५५ हजार रूपये किंमतीचा दागिने काढून दिले. चोरलेला १२ हजाराचा एलईडी हस्तगत केला आहे. पातोंडा शिवारात इलेक्ट्रिक पंपाची चोरीची देखील कबुली दिली असून त्यांच्या ९ हजार रूपये किंमतीचे दोन पंप जप्त केले आहे. चाळीसगाव पोलीसांनी दोन्ही गुन्ह्याची उकल करून सुमारे ८८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पो नि संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स फौ राजेंद्र साळुंखे, दिलीप रोकडे, नितीन सोनवणे, मालती बच्छाव, शंकज जंजाळे, पो ना संदीप माने, मनोज पाटील यांनी कारवाई केली आहे.