जळगाव ( प्रतिनिधी ) – बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील दोघांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित जळगाव एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांनी स पो नि जालिंदर पडे, पो उ नि अमोल देवढे, अशोक महाजन, अश्रफ शेख, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक तयार करुन रवाना केले. या पथकाने एमआयडीसी परिसरातून संशयित तानाजी मेंजा शिंदे (वय-३१, रा. खामकरवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) व त्याचा साथीदार राहुल मधुकर काळे (वय-२०, रा. सरमकोंडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) या दोघांना अटक केली.