जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा अस्थिरोग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण नुकतीच जळगावात सभा झाली या सभेत सर्व सभासदांच्या अनुमतीने जळगाव जिल्हा अस्थिरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र सरोदे व सचीवपदी डॉ. भुषण झंवर यांची निवड करण्यात आली.
ही निवड जाहीर झाल्यानंतर जिल्हा अस्थिरोग संघटनेचे नवे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे व सचीव डॉ. भुषण झंवर यांनी सांगितले की , जिल्हा अस्थिरोग संघटना पुढच्या वर्षी जळगावात होणाऱ्या राज्य अस्थिरोग संघटनेच्या राज्य परिषदेचे यजमानपद घेणार आहे . सर्व आयोजनाची जबादारी जिल्हा अस्थिरोग संघटनेची राहणार असून तब्बल २८ वर्षानंतर जळगावात होणाऱ्या या राज्य अस्थिरोग परिषदेच्या यशस्वीतेसाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आम्ही घेणार आहोत .
जिल्हा अस्थिरोग संघटनेचे नवे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे व सचीव डॉ. भुषण झंवर यांचे डॉ अनिल खडके , डॉ सुनील नाहटा , डॉ मिलिंद कोल्हे , डॉ प्रकाश कोचर , डॉ किशोर पाटील , डॉ अभिजित पाटील आदींनी अभिनंदन केले आहे .