पाचोरा ( प्रतिनिधी ) – जूनियर ३५ वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोऱ्याच्या एस एस एम एम महाविद्यालयाच्या विध्यार्थीनी भाग्यश्री प्रवीण पाटील हीने यंदा वर्चस्व गाजवले .
जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे महाराष्ट्रात व राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी पाचोरा एम एम कॉलेज 12वी कला शाखेतील विद्यार्थिनी तसेच जैन स्पोर्टस अकादमीची खेळाडू भाग्यश्री प्रवीण पाटील हीने गुरगाव येथे ९ ते १३ मार्चपर्यंत झालेल्या २० वर्षातील जूनियर ३५ वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत साडेसात गुणांसह द्वितीय क्रमांक पटकाविला व ७२ हजार रुपयाचे रोख पारितोषिकासह भारत सरकारतर्फे सहा फॉरेन टूर व पाच ग्रॅंडमास्टरचे कॅम्पसाठी तिची निवड झाल्याबद्दल पिटीसी चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ वासुदेव वले, बुद्धिबळ खेळाचे महाराष्ट्राचे पंच एन आर ठाकरे,संजय सूर्यवंशी व महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा गिरीष पाटील उपस्थित होते.