यावल (प्रतिनिधी) – यावल पोलीस ठाण्याच्या आवारात आज सकाळी पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

२० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास यावल तालुक्यासह शहर परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यस्वरूपाच्या पावसाच्या सरीही कोसळल्या. यापावसामुळे पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचरा झाला होता. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, व पोउनि विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल पठाण, पोलीस कर्मचारी सुशिल घुगे, भुषण चव्हाण, असलम खान, राहुल चौधरी, रोहील गणेश, विजय परदेशी, संतोष भोई, निलेश वाघ, महीला पोलीस कर्मचारी सिमा सिकलकर, ज्योती पाटील, गृहरक्षक दलाचे सागर पाठक, रऊफ खान, महेन्द्र माळी, श्रीराम धनगर, रामचंद्र सपकाळे, अजय कवडीवाले, गृहरक्षक दलाच्या महीला कर्मचारी पद्दमा खर्चे, संगीता मिस्त्रि, संगीता पाटील आजच्या स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदवुन पोलीस स्टेशनचे परिसर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले.







