जळगाव (प्रतिनिधी) – एप्रिल अखेर ऑफलाईन परीक्षा घेणे आता शासनाने निश्चित केले आहे. अश्या वेळी शिक्षकांना जर त्याआधीच दोघ डोस दिले गेलेत तर किमान योग्य वेळी प्रादुर्भाव प्रतिबंध होईल. अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांना फ्रंटलाईन -वॉरीयर्स म्हणून लस दिली आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा त्वरित शिक्षकांना कोविड-१९ लस देणे गरजेचे आहे. त्यानंतर शेकडोंच्या उपस्थितीत परीक्षा घेणे हे तर अपरिहार्य आहेच . हीच प्रतिबंधाची योग्य वेळ ठरेल कोविड-१९ च्या प्रदुर्भावात देशातील सर्वात जास्त हॉटस्पॉट असलेल्या शहरांतील आपण जळगावकर. जिल्ह्यात कोरोना प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे प्रशासनाने आधीच शाळेत विद्यार्थीबंदी तसेच, आता ५०% अस्थापना उपस्थितीचा योग्य निर्णय घेतला आहे. महाशय या आधी सुद्धा आम्ही लस देण्याची मागणी केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर काही शाळांमध्ये समूहाने शिक्षक बाधित झाल्याचे सर्वश्रुत आहे.म्हणून हीच ती वेळ – हीच विनंती. अशी मागणी प्रवीण जाधव जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी जळगाव यांनी केले आहे.








