पुणे (वृत्तसंस्था) – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. बीसीजी लस बनवण्याच्या युनिटला आग लागली असून अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मांजरीच्या साईडला असणाऱ्या सिरमच्या नवीन इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे समजते. आग कशी लागली हे अद्याप समजलेले नाही. करोना लस सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.







