जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने शुक्रवारी ( २१ जानेवारी ) दिलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात दिवसभरात ४१४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक असून ११६ रूग्ण आढळून आले जिल्ह्यातून आज २२१ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जळगाव शहर- ११६, जळगाव ग्रामीण-११ , भुसावळ-७९ , अमळनेर- २०, चोपडा-७८ , पाचोरा- १७, भडगाव- ५, धरणगाव- ४, यावल-१ , एरंडोल-४ , जामनेर- ३२, रावेर- ०, पारोळा- १६ , चाळीसगाव- २९, मुक्ताईनगर-० , बोदवड- ० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४१४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ११९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ३१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २२६ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८१ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे.