भडगाव ( प्रतिनिधी ) – येथील ‘स्व.बापूजी युवा फाऊंडेशन’च्या वतीने ‘शिव जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पारोळा चौफुलीचे ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, पंचायत समिती सभापती डॉ.अर्चना पाटील, डॉ. प्रमोद पाटील, स्व बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस लखिचंद पाटील, हर्षल पाटील, निलेश पाटील यांच्या उपस्थिती होती.
पारोळा चौफुलीवर स्व बापुजी युवा फाऊंडेशनच्या वतीने शिव जन्मोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली होती. यात चौफुलीवर ५० फुट लांब तर १५ फुट रुंद असा गडाचा देखावा तयार करण्यात आला. गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धकृती पुतळा विराजमान करण्यात आला होता. नागरिकांनी सकाळपासून या ठिकाणी महाराजाना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भव्य विद्युत रोशनाई विद्युत रोशणाईमुळे चौक परीसरात झगमगाट दिसून येत होता.
यावेळी शिवसेनेचे डॉ.विशाल पाटील, माजी नगरसेविक डॉ.प्रमोद पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, भाजपाचे अमोल शिंदे, माजी नगरसेविका योजना पाटील, गणेश परदेशी, तुषार भोसले, मनोहर चौधरी, शहरध्यक्ष आबा चौधरी, सौरभ पाटील, सेवानिवृत मुख्यध्यापक डी.डी.पाटील, चर्मकार संघाचे रवि अहिरे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, अनिल वाघ, बबलू देवरे, दिपक राजपूत, भैय्या राजपूत, आदींनी उपस्थिती देत महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक आबा महाजन यानी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय राजेद्र पाटील, वाहतुक पोलीस जगन्नाथ महाजन, ज्ञानेश्वर महाजन, सह.होमगार्ड संजय येवले, भरत चव्हाण, अरुण शिरसाठ, राजेद्र पाटील, अशोक वाघ, शेख शब्बीर, आकाश पाटील, दीपाली भोई आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश पाटील, जहांगिर मालचे, विनोद पाटील, हर्षल पाटील, जितेंद्र पाटील, प्रथमेश पाटील, चेतन राजपुत, पिटुं मराठे, हर्षल राजपुत, दुर्गेश वाघ, चेतन पाटील, प्रशांत सोनवणे, प्रशांत गालफाडे, भैय्या पाटील, अमोल पाटील, सुरेश सोनवणे, राहुल ठाकरे, यश बिरारी, संकेत मराठे, सचिन पाटील, भोला पाटील, किशोर राजपुत, वसिम भाई, दीव्येश कासार यांनी परीश्रम घेतले.