जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठकीतून पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून निर्धार

चोपडा (प्रतिनिधी) – सध्या राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात झाला आहे. त्यास अनुसरून दिनांक २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने काँग्रेसनेही त्याबाबतीत जिल्हास्तरावर बैठक घेऊन कंबर कसलेले आहे. यासाठी काँग्रेसचे जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन आगामी ग्रामपंचायत निवडणूकी साठी एकत्रित रित्या ताकदीनिशी सामोरे जाण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या येतील यासाठी रणनीती आखण्यात आली. जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी अडीच वाजता जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्या वेळेस हा निर्धार करण्यात आला.
या बैठकीत ग्रामीण भागात तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचलेला असल्याने त्याचा फायदा या निवडणुकीत निश्चित होणार असल्याचाही सूर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ब्लॉक निहाय आढावा ही यावेळी घेण्यात आला. जळगाव जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदिया व जिल्हाध्यक्ष अँड.संदीप पाटील यांनी मेळावा वजा बैठकीत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीत ब्लॉक अध्यक्षांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदीया, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जेष्ठ नेते श्री. डी. जी. पाटील, माजी आमदार निळकंठ फालक, माजी जिल्हा अध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, सुरेशबापू पाटील, माजी शहर अध्यक्ष डॉ.ए.जी. भंगाळे , सुलोचना पाटील , श्री. खलाने , जमील शेख, अविनाश भालेराव, योगेंद्र पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, एन एस यु आय जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे , मुनावर खान, प्रतिभा मोरे, विकास वाघ, अँड. अमजद पठाण, सचिन सोमवंशी, शंकर पहेलवान, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.







