जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त व निसर्ग मित्र समिती व टेंभे ग्रामपंचायत तालुका बागलान यांच्या तर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार 2020 आयोजन मालेगाव येथे तुषार शेवाळे यांच्या अध्यक्ष m.v.p. संस्था नासिक यांच्या अध्यक्षतेखाली व सौ. दुर्गाताई तांबे नगराध्यक्षा संगमनेर, भाऊसाहेब चिला अहिरे आदर्श सरपंच टेंभे ग्रामपंचायत, अतुल निकम संचालक नेहरू युवा केंद्र कर्नाटक यांच्या उपस्थितीत डॉ. पाकिजा पटेल यांना सन्मानित करण्यात आले .
डॉ. पाकिजा पटेल यांनी कोरोना काळात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल संस्थापक निसर्ग मित्र समिती धुळे प्रेम कुमार आहिरे यांनी दखल घेत महाराष्ट्र भूषण पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. या राज्य पुरस्कारामुळे डॉ. पाकीजा पटेल यांनी पुरस्काराची भरारी घेतलेली आहे. त्यांचे कार्य अखंड चालू आहे. नुकतीच त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. या पुरस्काराने राजवड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.








