चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील चहार्डी गावातील एका महिलेचा घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील चहार्डी गावात ५२ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह राहायलाआहे. शेतीचे काम करतात. दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील आशाबाई अभिमान शिरसाठ व भरत अभिमान शिरसाठ यांनी महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली. तसेच तिच्या भाच्याला देखील मारहाण केली. विवाहितेला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने चोपडा शहर पोलीस स्टेशनला दोन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भरत अभिमान शिरसाठ आणि आशाबाई अभिमान शिरसाठ यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप राजपूत करीत आहे.