पाचोरा (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा तालुका अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून वडगाव कडे येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप रमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्या आदेशान्वये तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी संदिप पाटील यांना भाजपा अटल कार्यालयात निवडीचे नियुक्ती पत्र प्रदान केले. तसेच आगामी काळांत आध्यात्मिक क्षेत्रात नवनवीन सामाजिक उपक्रम तथा पक्ष वाढीसाठी अमोल शिंदे यांनी संदीप पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी, तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे समवेत तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, प्रज्ञावंतआघाडीचे सुनिल पाटील, माजी सभापती बन्सीलाल पाटील,ओबीसी सेल जि.सरचिटणीस प्रदिप पाटील उपस्थीत होते.