जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हिंगणा येथील एक तरूण बनावट नोटांची छपाई घरातच करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पहूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .
काल पहूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी बस स्थानक भागात गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे उमेश चुडामन राजपुत ( वय २२ रा हिंगणे ता जामनेर ) यांस ताब्यात घेवून त्याची झडती घेतली त्यांच्या पॅन्टच्या खीशामध्ये २००/- रुपयांच्या तीन नोटा मिळुन आल्या त्यापैकी एक नोट संशयास्पद वाटल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली त्याने घरी हिंगणे बु// येथे युटुबवर पाहुन रंगीत प्रिंटर व मोबाईलच्या
सहाय्याने २००/- रुपयांच्या नकली नोटा तयार करून वितरित केल्याची माहिती दिली
पोलीस पथकाने हिंगणे गावी जावुन आरोपीच्या घराची झडती घेतली घरात कॅनॉन कंपनीचे प्रिंटर २०० रुपयांच्या ४६ बनावट नोटा व कोरे कागद असे साहीत्य मिळून आले या आरोपी विरोधात पहुर पोलीस ठाण्यात गु र न १७५/२०२२, भादवी कलम ४८९ अ, ४८९६, ४८९ सी, ४८ प्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने किती बनावट तयार केल्या व कोणकोणत्या मार्केटमध्ये वापरल्या त्यास कोणी मदत केली. याचा तपास पोलीस करत आहेत .
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोउपनि अमोल, पोहेकॉ विनय सानप, पोना ज्ञानेश्वर ढाकरे, पोकों ईश्वर देशमुख, गोपाल माळी यांच्या पथकाने केली.