नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. भारतातील या लाटेत विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे करोना मृत्यूची संख्या वाढत असल्याचं दृश्य आहे.
देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मात्र बुधवारी ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार ८७४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासांत २ लाख ७६ हजार ७० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ६९ हजार ७७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद झाली आहे.
देशात एकूण मृतांची संख्या दोन लाख ८७ हजार १२२ वर जाऊन पोहोचली आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ५९४ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात ३४ हजार ३१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.