जळगाव ( प्रतिनिधी ) – अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील हवालदार सुनीता पाटील व लेखा शाखेतील प्रमुख लिपिक रजनी पाटील उपस्थित होत्या.पाटील भगिनी या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक ललित नेमाडे यांनी भूषविले. महिला दिनाचे औचित्य साधून कर्तबगार महिलांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थिनींनी नारी शक्तीप्रति आदर व्यक्त केला. जिजाऊ -अनन्या कुंभार , इंदिरा गांधी- लावण्या कोळी , रण बेदी-प्राची कुंभार , झाशीची राणी- ईश्वरी सोनार , रमाई आंबेडकर-नंदिनी परदेसी , मदर तेरेसा-इशा गवळी, सावित्रीबाई फुले-साक्षी जाधव , सिंधुताई सपकाळ- नयन देवरे , आनंदी जोशी-पुनम निकम अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत.
इ.३री ते ७च्या विद्यार्थिनींनी भाषणे दिली. प्रास्ताविक उमेश चौधरी, सूत्रसंचालन ज्योती इंगळे यांनी केले . पाहुण्यांचा परिचय प्रवीण वायकोळे व स्नेहल ठाकूर यांनी करून दिला. शिक्षिका वैशाली राठोड व शारदा धांडे यांचीदेखील उपस्थिती होती. आभार प्रदर्शन प्रदर्शन नीलिमा वारके यांनी केले.